Thursday, March 12, 2015

ओझर

  
नारायणगाव पासून अगदी ६ किलोमीटर अंतरावर असलेले अष्टविनायक देवस्थान ...... 

ओझर

विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.

आख्ययिका

राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला

इतिहास


१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.


बांधकाम

विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.

उत्सव

भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.


नारायणगाव  जवळील( अष्टविनायक देवस्थान ) लेण्याद्री गणपती विषयी

लेण्याद्री

गिरिजात्मज (लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकीएक आहे.अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत.
त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायरया चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नरतालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नांव पडले.

आख्यायिका

पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नांव मिळाले.

स्वरूप


पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणीयेथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखडय़ावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघसिंहहत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे. सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणं आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे.या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.

या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते.




Earn upto Rs. 9,000 pm checking Emails. Join now!


Dear All

Kindly join and earn free recharge and money as well
http://www.PaisaLive.com/register.asp?6438290-4300908